मनोगत


24 फेब्रुवारी 2009 रोजी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी ता.वैजापुर
जिल्हा औरंगाबाद येथे रुजू झालो.शिक्षणसेवक म्हणून काम करत असताना अनेक
चांगल्या लोकांशी संपर्क आला अनेकांचे मार्गदर्शन मिळाले शाळेबद्धल पालकांचे
प्रेम आपुलकी अतिशय उल्लेखनीय बाब.सर्व सहकार्‍यांच्या मदतीने शाळेचा विकास
करण्याचा इमाणे इतबारे प्रयत्न केला.त्यामध्ये मुख्याध्यापक श्री तुपे सर,श्री
लंबे सर,यांचे मार्गदर्शन तर श्री ठुबे सर,मापारी सर ,काटकर सर,ठोंबरे सर,श्रीमती साबळे मैडम,श्रीमती काटे मैडम,श्रीमती तुपे मैडम,सूर्यवंशी मामा,बंडगर सर यांच्या
सारख्यांची साथ होतीच.

एका शिक्षकाला गावकर्‍यांकडून जेवढा मान मिळायला पाहिजे त्यापेक्षा जास्त
अगदी घरातल्या सदस्यासारख प्रेम मिळालं प्रत्येक शिक्षकदिनाला होणारा
शिक्षकांचा सत्कार कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठच ...कागदाच्या त्या
तुकड्यापेक्षा या जीवंत पणाला जास्त महत्व.जुलै 2014 मध्ये आंतरजिल्हा
बदलीने नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी ता.हदगाव
येथे रुजू झालो.बर्‍याच दिवसापासून काहीतरी शाळेसाठी करायच ठरवलं होत...आणी या
शाळेतील माजी शिक्षकाला राष्ट्रपति पुरस्कार मिळालेला त्यामुळे आणखीनच ऊर्जा
मिळाली.सोबत औरंगाबाद जिल्ह्यातील शिदोरी होतीच.मग इथे हस्ताक्षर
सुधार,बोलक्या भिंती,स्वतः मी चित्रे काढून केल्या.बोलके बेंच..यासारखे
उपक्रम राबवले..त्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकारी लाभले.श्री गाढे सर
मुख्याध्यापक ,श्री राऊत सर,श्री,तावडे सर,श्री डोके सर,श्री अंभोरे सर,श्री
उपाडे सर,आणि त्याचबरोबर मित्र म्हणून दिनेश धोंगडे,सूरज पाटील,सचिन
नरवाडे,राहुल भातनासे ,शरद सोनवणे सर,संदीप डुडूळे,श्रीकांत रोठे,सतीश जाधव,बी.एम पाटील,रविंद्र
डोंगरे,यांनी प्रोत्साहन दिले.

विशेष म्हणजे आमचे गटशिक्षणाधिकारी श्री येरपूरवार साहेब हे उर्जास्थान
राहिले..


*" ओले मूळ भेदी खडकांचे अंग ,*

* अभ्यासासि सांग कार्यसिध्ही "*

वृक्षाचे ओले मुळ सुध्हा ज्याप्रमाणे हळूहळू खडकाला भेदून त्याच्या आत घुसते
त्याच प्रमाणे उत्कट इछेच्या बळावर कठीण उदधिष्ट सुध्दा साध्य करून घेता येते.

5 comments: