Thursday, January 1, 2015

नांदेड जिल्ह्याविषयी

नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोर्यात
आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. आदिलाबाद
व निझामाबाद (आंध्र प्रदेश), बिदर (कर्नाटक),
यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे
नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. नांदेड
जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय
दिशेच्या बाजूने) कर्नाटक व आंध्र प्रदेश
या राज्यांशी जोडतो.
जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे
डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून
जिल्ह्याच्या दक्षिण- नैऋत्य सीमेवर
बालाघाटचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या मध्य
भागातून गोदावरी नदी वाहते, हा प्रदेश
सपाट व सुपीक आहे. किनवट तालुक्यातील
डोंगराळ भागात प्रामख्याने सागाची व
बांबूची वने आढळतात.

No comments:

Post a Comment