Tuesday, January 6, 2015


       "स्वग्रामे पूज्यते देवता,स्वराज्य पूज्यते राजा.
         स्वगृहे पूज्यते जेष्ठा,विद्वान सर्वत्र पूज्यते."
खरोखर ही वाक्य ज्यांच्यासाठी खोटी ठरणार नाहीत.माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा                                                            काचेसारखा पांढराशुभ्र यावर ज्यांचा विश्वास आहे आणि ज्यांच्यामध्ये ही
उक्ती साकारली आहे असे आमच्या हदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री
येरपूरवार साहेब.मी पाहिलेल्या अधिकार्‍यांत यांचं व्यक्तिमत्व खरोखर खूप
वेगळं.कर्तव्य दक्ष्य आणि नेहमी शिक्षकाला प्रोत्साहन देनारे.ते आल्यापासून
तालुक्यातील शिक्षणाची घडी व्यवस्थित बसली.दर्जा सुधारला.ते येण्यापूर्वी
शिक्षणाचा दर्जा खालावलेला होता.पण त्यांनी दाखवून दिल की ग्रामीण भागातही
हायटेक शिक्षण देता येऊ शकते.कार्यालयीन वेळेच्या नंतरही ते आपल्या कामात
असतात.ते आल्यापासुन शिक्षकांच्या अनेक अडचणी दूर झाल्यात.त्यांनी कधीच
अधिकार्‍यांसारखी अधिकारशाही वापरली नाही म्हणून ते असामान्यातील सामान्य
अधिकारी ठरले.
ते नेहमी म्हणतात. विधयार्थ्यांची ऊंची शिक्षकांच्या ऊंची पेक्षा जास्त असू
शकत नाही .शिक्षकांची ऊंची समाजाच्या ऊंची पेक्षा जास्त असू शकत नाही.समाजाची
ऊंची त्याला दिल्या जाणार्‍या शिक्षणापेक्षा जास्त असू शकत नाही.याचा अर्थ
विध्य्यार्थी,शिक्षक,समाज,आणी शिक्षण यांचा एक परस्पर सह संबंध आहे

No comments:

Post a Comment